Last Updated: Tuesday, February 19, 2013, 14:03
www.24taas.com, मास्को रशियाच्या यूराल पर्वताला टक्कर देऊन एक तीव्र तरंग निर्माण करणाऱ्या उल्कापिंडेच्या तुकड्याचा शोध लावल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय. या उल्कापातात जवळपास १२०० लोकांना जखमी केलं होतं तर हजारो घरांची पडझडही झाली होती.
अंतराळातून एका मोठा दगडासारखा तुकडा उल्कापिंडेच्या रुपात गेल्या शुक्रवारी रशियातल्या चेल्याबिंस्क शहराला धडकला होता. या धडकेची तीव्रता दुसऱ्या विश्वयुद्धातील हिरोशिमामध्ये केल्या गेलेल्या अणुबॉम्बच्या तीव्रतेपेक्षा ३० टक्के जास्त होता. पृथ्वीपासून काही डझनभर मील अंतरावर हा विस्फोट झाला परंतू त्यावेळी या उल्केचे तुकडे पृथ्वीवरील उद्यमशील क्षेत्रात दूरवर पसरले.
एका छोट्या सरोवरची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला तिथं काहीच मिळालं नव्हतं. पण, आता मात्र वैज्ञानिकांना, या सरोवरात उल्केचे तुकडे नक्की मिळणार याची खात्री झालीय.
काही विचित्र पर्वतांवर आणि दगडांवर रासायनिक अभ्यास करणाऱ्या रशिया विज्ञान अकादमीच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार हे तुकडे बाहेरच्या अंतराळातून आले होते. या अकादमीचे एक सदस्य विक्टोर ग्रोखोवस्की यांनी काल मीडियाशी दावा केला की, ‘आमच्या अभ्यासात चेबाकरुल सरोवराजवळ मिळालेल्या कणांच्या पदार्थाची संरचना एका उल्कापिंडेचीच आहे.’
First Published: Tuesday, February 19, 2013, 14:03