Last Updated: Saturday, February 16, 2013, 15:08
www.24taas.com, मास्को वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियातील संसदेचे सभासद ब्लादिमीर जिरनोवस्की यांनी ‘रशियावर उल्कावर्षाव झालाच नव्हता, तर अमेरिकेनं केलेल्या स्फोटक हत्यारांच्या परिक्षणांचा परिणाम म्हणून रशियावर संकट कोसळलं’ असं म्हटलंय.
न्यूज एजन्सी ‘आरआयए नोवोस्ती’नं दिलेल्या माहितीनुसार, रशियातील लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते जिरिनोवस्की शुक्रवारी रशियावर कोसळलेल्या संकटाला अमेरिकेला जबाबदार धरलंय. आकाशातून उल्कापात झाल्यानं ही रशियाला हे नुकसान झालेलं नाही, तर अमेरिकेनं नव्या स्फोटक हत्यारांचं परिक्षण केलं आणि त्यामुळेच हा प्रकार घडला असं, जिरनोवस्की यांनी म्हटलंय.
‘पृथ्वीबाहेरच्या जगात स्वत:चे असे कायदे असतात, तिथून काहीच पृथ्वीवर आदळू शकणार नाही. आणि जर पृथ्वीवर अशी काही वेळ आलीच तरी ती याच पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांच्या विविध कारस्थानांमुळे येते... हीच लोक युद्ध भडकावतात’ असंही जिरनोवस्की यांनी म्हटलंय.
मध्य रशियातील युराल पर्वतरांगामध्ये शुक्रवारी पहाटे जबरदस्त स्फोट होऊन आकाशातून एक चमकणारी वस्तू पृथ्वीवर पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने दिली होती. या घटनेत रशियाला जबरदस्त हादरा बसला. जवळजवळ १५०० लोक यावेळी जखमी झालेत. हा स्पोट इतका भीषण होता की इमारतीही हादरल्या, खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि लोकांमध्ये एकच धावपळ उडाली. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ९८५ लोकांना उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय जखमींमध्ये लहान मुलांची संख्या २०० हून अधिक आहे.
First Published: Saturday, February 16, 2013, 15:07