अजब...एकाच स्त्रीबरोबर दोन प्रियकरांचे लग्न, same woman married with two man

अजब...एकाच स्त्रीबरोबर दोन प्रियकरांचे लग्न

अजब...एकाच स्त्रीबरोबर दोन प्रियकरांचे लग्न
www.24taas.com झी मीडिया, केनिया

एक थक्क करणारी बातमी. दोन प्रियकर आणि एक प्रेयसी. दोघांमधून एकाची निवड करण्यास प्रेयसीचा नकार. त्यामुळे काय करायचे, यावर खल सुरू झाला. तोडगा काही निघेना. त्याचवेळी प्रेयशी ही विधवा असून तिला मूलही आहे. असे असताना दोघांनाही तिच्याशी लग्न करायचे होते.

प्रेयसीने एकाची निवड करण्यास नकार दिल्याने केनियातील दोन प्रेमींनी तडजोड केली. त्यानुसार हे दोघेही आता पत्नी शेअर करणार आहेत. विशेष म्हणजे ही स्त्री विधवा असून तिला दोन जुळे मुलेही आहेत. आता दोघेही प्रेमी एकाच स्त्रीबरोबर विवाह बंधनात अडकणार आहेत. सिल्व्हेस्टर म्वेंद्वा आणि एलिजा किमानी अशी त्या दोघांची नावे आहेत.
एकाच महिलेवरून दोन प्रेमींमध्ये भांडण होत असल्याची माहिती अदलाह नावाच्या व्यक्तीला समजले. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी तो गेला. पण त्या दोघांनाही तिच्याबरोबर राहायचे होते, असे अदलाह याला त्यांनी सांगितले. त्यानंतर हा करार करण्यात आलाय.

मोबासा प्रदेशातील या प्रेमवीरांना दोघांचेही चार वर्षांपासून एकाच महिलेशी सुत जुळले. काही दिवसांपूर्वी दोघांनाही समजले की आपण एकाच महिलेवर प्रेम करीत आहोत. आता करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, प्रेमासाठी वाटेल ते या म्हणीनुसार त्यांनी तडजोड केली. आता त्यांनी अनोख्या करारावर सह्या केल्या.

या करारानुसार त्या दोघांना त्या महिलेसोबत मुलांसह संसार करावा लागेल. तसेच त्यांना एकमेकांबद्दलही आदर ठेवावा लागेल. कारण तसे करारात नमूद आहे. हे तिघेही २५ ते ३१ या वयोगटातील आहेत. दरम्यान, या महिलेबरोबर विवाह करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांची परवानगी घेऊन परंपरेनुसार त्यासाठीची रक्कमही दिल्याचा दावा दोघांनी केला.

केनियामध्ये एकापेक्षा अधिक पत्नी असणे ही साधारण बाब आहे. त्यामुळे आता या दोन्ही प्रेमवीरांना त्यांच्या समाजामध्ये एकाच स्त्रीबरोबर दोघांनी विवाह करण्याची प्रथा असल्याचे सिद्ध करावे लागणार असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 30, 2013, 16:06


comments powered by Disqus