Last Updated: Monday, November 18, 2013, 20:05
www.24taas.com, वृत्तसंस्था, वाशिंग्टनसध्या सोशल मीडियाचा वापर भारतात भरपूर होतांना दिसतो. मात्र असं असलं तरी जगात ट्विटरच्या वापरात भारत सध्या मागे असल्याचं एका सर्वेक्षणात पुढं आलंय. जगात ट्विटरच्या वापरात सौदी अरेबियातील नागरिक सर्वात पुढं आहेत.
३२ टक्के सौदी नागरिक ट्विटरवर सक्रिय असतात तर भारत, नायजेरिया आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये ट्विटर वापरणार्यांकची संख्या सर्वात कमी म्हणजे केवळ एक टक्का एवढीच आहे. पीअर रिचनं हे सर्वेक्षण केलं असून, जे युर्जस केवळ लॉग इन नव्हे तर ट्विटर्सवर पोस्ट करतात, अशाच युर्जसना यात सक्रिय मानण्यात आलंय.
सक्रिय युर्जसच्या संख्येवरून सर्वाधिक वापर करणार्याभ देशांची यादी बनविण्यात आली असून यातील पहिले पाचही देश इंग्रजी न बोलणारे आहेत, तर मायक्रोब्लॉगिंगची जन्मदाता अमेरिका आठव्या क्रमांकावर आहे! इंटरनेट वापरणार्याआ सौदी अरेबिया आणि इंडोनेशियातील बहुतांश नागरिकांकडे संगणक नाहीत. परंतु स्मार्टफोनद्वारं ते इंटरनेटचा वापर करतात, असं पीअर रिचनं म्हटलंय. चीनमध्ये ट्विटरवर बंदी असल्यामुळं या देशाचा या यादीत समावेश नाही.
ट्विटर वापरणारी टॉप १० यादीत सौदी अरेबिया, इंडोनेशिया, स्पेन, व्हेनेझुएला, अर्जेंटिना, ब्रिटन, नेदरलँड, अमेरिका, जपान आणि कोलंबिया हे देश आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, November 18, 2013, 19:59