पत्नीच्या पर्समध्ये सिगारेट, पतीने दिला घटस्फSaudi man divorces wife for having cigarette in her bag

पत्नीच्या पर्समध्ये सिगारेट, पतीने दिला घटस्फोट

पत्नीच्या पर्समध्ये सिगारेट, पतीने दिला घटस्फोट

www.24taas.com, वृत्तसंस्था, दुबई
पत्नीच्या पर्समध्ये सिगारेट आढळून आल्यामुळे पतीराज एवढे संतापले की, त्यांनी पत्नीला घटस्फोट दिला. सौदी अरेबियात ही घटना घडली.

आपल्याला धूम्रपानाचे व्यसन नसल्याचे सांगून पत्नीने घटस्फोट देऊ नका, अशी वारंवार केलेली विनंतीही त्याने मान्य केली नाही. लग्नाला केवळ तीन महिनेही उलटले नसताना घटस्फोटाची आफत ओढवली.

पतीचा पारा उतरलाच नाही. त्याचे मन वळवून समेट घडविण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले, असे गल्फ न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 26, 2013, 11:38


comments powered by Disqus