ऐकलंत का... राणी एलिझाबेथपेक्षा सोनिया गांधी श्रीमंत!`Sonia Gandhi richer than Queen Elizabeth`

ऐकलंत का... राणी एलिझाबेथपेक्षा सोनिया गांधी श्रीमंत!

ऐकलंत का... राणी एलिझाबेथपेक्षा सोनिया गांधी श्रीमंत!
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या राणी एलिझाबेथ, ओमानचे सुल्तान, मोनॅकोचे राजे आणि कुवेतचे शेख यांच्यापेक्षाही श्रीमंत असल्याचा, दावा ह्युफिंग्टन पोस्ट वर्ल्डनं केलाय.

जगभरातील राजे, राणी, अध्यक्ष, सुल्तान यांच्या संपत्तीचं सर्वेक्षण केल्यानंतर ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांत सत्तेवर असलेल्या २० नेत्यांची यादी देण्यात आली आहे. ह्युफिंग्टन पोस्ट वर्ल्डनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गांधी यांच्या नावावर २ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती आहे.

भारताचं दरडोई उत्पन्न दीड हजार डॉलर एवढं आहे. त्यापेक्षा गांधी यांची संपत्ती जास्त आहे. जगभरातील या २० नेत्यांच्या यादीत सोनिया गांधी १२ व्या स्थानावर आहेत. या यादीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन पहिल्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे ४० अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती आहे. त्यापाठोपाठ थायलंडचे राजे भूमीब्योल अद्युल्यदेज यांच्याकडे ३० अब्ज डॉलर संपत्ती आहे.

ह्युफिंग्टन पोस्ट वर्ल्डनं गांधी यांच्या संपत्तीबाबत हा खुलासा केला असला तरी, भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर त्यांच्या संपत्तीचे आकडे वेगळेच आहेत. आयोगाच्या वेबसाईटनुसार सोनिया गांधींकडे १.३८ कोटी रुपयांची संपत्ती असून, भारतात त्यांच्या नावावर एकही घर किंवा कार नाहीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 2, 2013, 17:11


comments powered by Disqus