स्टीव्ह जॉबची प्रेयसी उघडणार त्याची गुपिते, Steve Job girlfriend

स्टीव्ह जॉबची प्रेयसी उघडणार त्याची गुपिते

स्टीव्ह जॉबची प्रेयसी उघडणार त्याची गुपिते
www.24taas.com, लंडन

स्टीव्ह जॉब्स यांची प्रेमिका व त्यांच्या मुलीची आई ख्रिस अँन ब्रेनान जॉब्ससोबतच्या आठवणींवर पुस्तक लिहीत आहे. यात ती जॉब्स यांच्याबाबतच्या अनेक रहस्यांचा उलगडा करणार आहे. ‘सेंटर मार्टिन’ साठी आठवणी शब्दबद्ध करण्याचे तिने मान्य केले आहे.

१९७७ साली त्याच्या बरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असलेली त्याची मैत्रिण ख्रिस अँन ब्रेनान गर्भवती राहिल्यानंतर त्याने त्याचे पितृत्व स्वीकारायला नकार दिला होता. आणि एवढेच नव्हे तर त्याने गर्भपात करण्याविषयी तिला बजावलं होतं.

ख्रिसने नकार दिल्यानंतर जॉब्सने तिच्याशी संबंध तोडले. ख्रिसने लिसा निकोलला जन्म दिल्यानंतर डीएनए टेस्टने जॉब्स तिचा पिता असल्याचं सिध्द झाल्यानंतरही त्याने मुलाच्या संगोपनाचा खर्च द्यायला नकार दिला. अखेरीस न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर नाईलाजाने त्याने पैसे दिले.

First Published: Wednesday, October 17, 2012, 12:49


comments powered by Disqus