पाकिस्तान: पेशावरला चर्चमध्ये मानवी बॉम्ब फुटला- ४० ठार Suicide attack outside Peshawar church in Pakistan, 40 killed

पाकिस्तान: पेशावरला चर्चमध्ये मानवी बॉम्ब फुटला- ४० ठार, ४५ जखमी

पाकिस्तान: पेशावरला चर्चमध्ये मानवी बॉम्ब फुटला- ४० ठार, ४५ जखमी
www.24taas.com, झी मीडिया, पेशावर

भीषण आत्मघातकी स्फोटानं पाकिस्तान हादरलंय. पेशावरमधील एका चर्चमध्ये आत्मघातकी स्फोट झालाय. स्फोटात ४० जण ठार झाले असून ४५ जण जखमी झाले आहेत.

ज्यावेळी पेशावरमधील चर्चमध्ये ५०० हून अधिक जण उपस्थित होते. त्यावेळी हा स्फोट घडवण्यात आलाय. चर्चमध्ये दोन स्फोटांचे आवाज आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. स्फोटाची तिव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पेशावरमधील गजबजलेल्या कैस्सा खवानी बाजारात हा हल्ला झाला. चर्चमध्ये असलेल्या रविवारच्या प्रार्थनेचा मोका साधून दहशतवाद्यांनी ख्रिस्ती बांधवांना लक्ष्य केलं. जवळपास ५०० जण यावेळी चर्चमध्ये होते. बॉम्बस्फोटानंतर तिथं एकच खळबळ उडाली असून जखमींवर वेगानं उपचार होण्यासाठी शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे.

या घटनेच्या वृत्ताला दुजोरा देताना मोहम्मद नूर खान या पोलीस अधिकाऱ्यानं प्रार्थना करून बाहेर पडत असतानाच ख्रिस्ती बंधवांना मानवी बॉम्बनं गाठल्याचं सांगितलं. हल्लेखोराचे तुटलेले पाय चर्चसमोर पडलेले आढळल्याचंही त्यांनी नमूद केलं, तर प्रत्यक्षदर्शींनं चर्चच्या गेटवरच दोन स्फोट झाल्याचं सांगितलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 22, 2013, 13:51


comments powered by Disqus