Last Updated: Sunday, June 22, 2014, 18:31
www.24taas.com, पीटीआय, ज्यूरिक स्वीस बँकेत काळा पैसा जमा करणाऱ्या भारतीयांची यादी स्वित्झर्लंडनं तयार केलीय. स्वित्झर्लंड सरकारच्या अधिकाऱ्यानं हे विधान केलंय. भारत सरकारसोबत याबाबत संयुक्त तपशील जारी करण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय.
स्वित्झर्लंड सरकारच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, देशात असलेल्या विविध बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या काळ्या पैशाची चौकशी करतांना त्यांची नावं पुढं आली हेत. या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरलेला नाही. मात्र या व्यक्तींची किती रक्कम बँकांमध्ये आहे, हे त्या अधिकाऱ्यानं सांगितलं नाही. दोन्ही देशातील गोपनीयता आणि द्विपक्षीय संबंधांचं कारण देत ही माहिती दिली नाही.
भारत सरकारद्वारे काळ्या पैशाच्या चौकशीसाठी तयार केलेली समिती (एसआयटी)ला संपूर्ण सहकार्य़ करणार असल्याचंही अधिकाऱ्यानं सांगितलं. स्वीस बँकेत असलेला भारतीयांचा काळा पैसा हा हजारों अरब डॉलरमध्ये नसल्याचंही अधिकाऱ्यानं सांगितलं.
स्वीस बँकेतील ताज्या आकड्यांनुसार देशातील 283 बँकांमध्ये परदेशी ग्राहकांचं धन 1,600 अरब डॉलक आहे. तर त्यात भारतीयांच्या धनात वाढ होवून 2.03 अरब स्वीस फ्रँक (14 हजार कोटी रुपये) वर पोहोचलेत. हे धन ज्यांचं आहे त्यांनी स्वत:ला भारतीय घोषित केलंय. त्यात बेकायदेशीर पैसा असण्याची शक्यता नाहीय.
यापूर्वी स्वीस सरकार एचएसबीसीच्या यादीनुसार भारतींयाची माहिती देण्यास नकार देत आलंय. ही यादी एका बँक कर्मचाऱ्यानं चोरली होती आणि नंतर भारतासह इतर देशांमधील कर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली होती. भारत सरकारनं अनेक वेळा आग्रह केल्यानंतरही स्वित्झर्लंड सरकारनं माहिती देण्यास नकार दिला होता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 22, 2014, 18:12