Last Updated: Monday, June 4, 2012, 16:37
www.24taas.com, इस्लामाबाद पाकिस्तानातील आदिवासी परिसरात आज सोमवारी पहाटे करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात आठ संशयित दहशतवादी ठार झाले. दरम्यान, पाकिस्तानने ड्रोनने हाती घेतलेली ही मोहीम थांबविण्याचे आवाहन केले आहे.
रविवार पहाटेदेखील ईशान्य पाकिस्तानावर ड्रोनने अशाचप्रकारचा हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात आदिवासी परिसरावर चार क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते. शनिवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यात दहशतवाद्यांच्या म्होरक्याचा भाऊ ठार मारला गेला होता. त्याला श्रद्धांजली वाहाण्यासाठी अन्य दहशतवादी एकत्र जमले होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला.
अफगाणिस्तानला लागून असलेला उत्तर वाझिरिस्तान या भागात आदिवासी मोठ्या संख्येने राहातात. तसेच, दहशतवाद्यांचे हे लपण्याचे ठिकाण असल्याचेही सांगितले जाते. करण्यात आलेल्या हल्ल्यात दहा संशयित दहशतवादी ठार झाले होते, अशी माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
First Published: Monday, June 4, 2012, 16:37