Last Updated: Tuesday, June 12, 2012, 08:21
www.24taas.com, इस्लामाबाद पाकिस्तानचं कुठल्याही राष्ट्राशी शत्रुत्व नसल्याचं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख अश्रफ परवेज कयानी यांनी एका समारंभात स्पष्ट केलं. १९७१च्या युद्धात भारतीय टँकरशी लढताना मृत्यूमुखी पडलेल्या एका पाकिस्तनी सैनिकाच्या चरित्रग्रंथाच्या उद्घाटनासाठी लष्कर प्रमुख उपस्थित होते.
पाकिस्तान हा शांतताप्रिय देश असून तो इतर कुठल्याही राष्ट्रावर हल्ला करत नाही, पण आम्ही आमचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मरोस्तोवर लढू शकतो.
१९६५ आणि १९७१ साली झालेल्या युद्धात मेजर शब्बीर यांनी ज्या हिंमतीने भारताशी युद्ध केले, तशाच पद्धतीने शहिद होणं, हिच कुठल्याही पाकिस्तानी सैनिकाची इच्छा असते.
First Published: Tuesday, June 12, 2012, 08:21