नऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा - Marathi News 24taas.com

नऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा

झी २४ तास वेब टीम, बीजिंग
 
हिऱ्यांची तस्करी केल्याबाबत नऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा खायला लागली आहे. तस्करी केलेल्या हिऱ्यांची किंमत ७३ लाख अमेरिकन डॉलर आहे.
 
हिऱ्यांच्या तस्करीप्रकरणी  भारतीय व्यापाऱ्यांना चीनमध्ये विविध कालावधीसाठी तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड सुनावण्यात आला आहे. याच प्रकरणाशी संबंधित इतर १३ व्यापाऱ्यांना भारतात परत पाठविण्याचे आदेश देण्यात आलेत.
 
हॉंगकॉंगहून १४ कॅरेटच्या हिऱ्यांची तस्करी केल्याप्रकरणी मूळ गुजरातमधील असलेल्या २२ व्यापाऱ्यांना शेन्झेन प्रांतात अटक करण्यात आली. अटक झालेल्यांपैकी नऊ व्यापाऱ्यांना पाच ते सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. या प्रकारामुळे भारत आणि चीनमधील परस्पर संबंधांमध्ये हे प्रकरण संवेदनशील ठरले आहे.

First Published: Thursday, December 8, 2011, 07:45


comments powered by Disqus