Last Updated: Monday, June 18, 2012, 10:14
www.24taas.com, ग्रीक सर्व जगाचे लक्ष लागून असलेल्या ग्रीकमध्ये न्यू डेमॉक्रसी पार्टीचा विजय झाला आहे. मात्र, या ठिकाणी कोणालाच बहुमत मिळाले नसल्याने त्रिशुंकू अवस्था निर्माण झाली आहे.
या निवडणुकीतन्यू डेमॉक्रसी पार्टीला सर्वाधिक म्हणजे ३०.५ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बेलआउट ला विरोध करणाऱ्या पक्षाला पराभावाला सामोरे जावे लागले आहे. सिरिजा यांना २६ टक्के मतदान झाले.
या निवडणुकीत कोणलाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र, न्यू डेमॉक्रसी पार्टी आणि पार्टी पासोक यांच्यात आघाडी होण्याची शक्यता असून त्यांचेच सरकार असण्याची शक्यता आहे. पासोक पक्षाला १३ टक्के मतदान झाले आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर ३०० जागांच्या संस्थेत या दोन्ही पक्षाच्या १६१ जागा होतील. सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
First Published: Monday, June 18, 2012, 10:14