पाकिस्तानात नवा खेळ.. नवे पंतप्रधान... - Marathi News 24taas.com

पाकिस्तानात नवा खेळ.. नवे पंतप्रधान...

www.24taas.com, मुंबई
 
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून रजा परवेज अशरफ यांची निवड झाली आहे. त्यांनी PMNLच्या उमेदवाराचा २११ मतांनी पराभव केला. रजा परवेज अशरफ पाकिस्तानचे २५ वे पंतप्रधान असणार आहेत. गिलानींच्या मंत्रिमंडळात परवेज आयटी मंत्री होते.
 
गिलानींना सुप्रीम कोर्टानं अपात्र ठरवल्यानंतर रजा परवेज अशरफ यांची नवे पंतप्रधान म्हणून आज निवड झाली. सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीने रजा परवेज अशरफ यांच्या नावाला मंजुरी दिल्यानंतर त्यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला.
 
सध्या पाक संसदेचं विशेष अधिवेशन सुरु आहे. त्यात रजा अशरफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. गेल्या अडीच महिन्यांपासून पाकच्या संसदेचं कामकाज पंतप्रधानांशिवाय सुरु होतं. मात्र आता पाकिस्तानला नवा पंतप्रधान मिळाला आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Friday, June 22, 2012, 22:18


comments powered by Disqus