चला 'मंगळावर पाण्याची' सोय तर आहे..... - Marathi News 24taas.com

चला 'मंगळावर पाण्याची' सोय तर आहे.....

www.24taas.com, न्यूयॉर्क 
 
मंगळ ग्रहावर पृथ्वीइतकाच पाण्याचा साठा असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. पाणीसाठी असण्याबरोबरच पृथ्वीच्या भूगर्भात आढळणारा ओलसरपणाही मंगळावर आढळल्याचे सांगण्यात येते.
 
मंगळ ग्रहाबाबतचे नवे निष्कर्ष 'जिऑलॉजी जनरल'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या नव्या संशोधनामुळं मंगळावर अल्प प्रमाणात पाणी असल्याचा दावा खोडून निघाला आहे.
 
अनेक वर्षांपूर्वी मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्याचा प्रवाह वाहत होता, असे सांगण्यात आले होते. मंगळावर जर पृथ्वीइतकाच पाण्याचा साठा मिळाल्यास हा खूप मोठा शोध असणार आहे...
 
 
 
 

First Published: Monday, June 25, 2012, 23:44


comments powered by Disqus