झरदारींच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव - Marathi News 24taas.com

झरदारींच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव

झी २४ तास वेब टीम, इस्लामाबाद



पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांना  मेंदूमध्ये रक्तस्त्राव सुरू झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी दुबईहून लंडनला हलवण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 

मेंदूमध्ये रक्तस्त्राव असून, अर्धांगवायूचा त्यांच्या चेह-यावरही परिणाम झाला आहे. मात्र, त्यांच्या जीवाला धोका  नसल्याचे पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले आहे.    उपचारांसाठी झरदारी  यांना मंगळवारी दुबईला हलवण्यात आले होते.



'मेमोगेट' प्रकरणानंतर लष्कराचा दबाव  वाढत असल्यामुळेच झरदारी दुबईला गेले.  ते काही दिवस राजीनामा देतील, अशी
शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तान पीपल्स पाटीर्चा कारभार पाहण्यासाठी झरदारी यांचे पुत्र बिलावल पुढे आला आहे.

First Published: Saturday, December 10, 2011, 11:36


comments powered by Disqus