लेखिका तस्लिमा नसरीन दहशतीखाली - Marathi News 24taas.com

लेखिका तस्लिमा नसरीन दहशतीखाली

झी २४ तास वेब टीम, बेल्जियम
 
बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन सतत दहशतीत  जगतायत. बांगलादेशनं बाहेर काढल्यानंतर भितीच्या सावटाखाली त्या जगतायत. युरोपियन संसदेतही त्यांनी मानवाधिकार कार्यकर्त्यांच्यापुढं हीच भावना व्यक्त केली.
 
मानवाधिकार हननावर बेल्जियममध्ये  युरोपियन संसदेच्या एका सभागृहात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात बांग्लादेशी लेखिका तसलिमा नसरिन याही सहभागी झाल्या होत्या.
 
आपल्याला कधीही जीवे मारले जाऊ शकतं अशी त्यांना सतत भीती असते. आपल्याला आपल्या देशातून हाकलून लावण्यात आल्यानंतर जीवाच्या भीतीनं आपण जगभर भटकत असून आपल्याला कुठेतरी हक्काचं घर मिळावं अशी याचना त्यांनी युरोपियन संसदेत झालेल्या चर्चासत्रात व्यक्त केली.
 
तसलिमा नसरिन यांनी राहण्यासाठी हक्काचा निवारा मिळू नये ही मानवी हक्काच्या उल्लंघनाची परिसिमा असल्याचं मत यावेळी विविघ देशातून आलेल्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.27 देशांचं प्रतिनिधीत्व करणा-या युरोपियन संसदेनं नसरीन यांना न्याय द्यावा, अशी सूचना केली.
 
खासदार सिसेलिया यांच्या खास पुढाकारानं या चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. नसरीन यांना न्याय मिळावा अशी मागणीही व्यक्त करण्यात आलीय.

First Published: Saturday, December 10, 2011, 16:06


comments powered by Disqus