गांधींची वादग्रस्त पत्रं भारताला मिळणार का? - Marathi News 24taas.com

गांधींची वादग्रस्त पत्रं भारताला मिळणार का?

www.24taas.com, लंडन
 
दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासादरम्यान भारत सरकार महात्मा गांधींशी संबंधित काही आठवणी विकत घेण्याची शक्यता आहे. लीलाव करणाऱ्या सॉथबे या संस्थेच्या मते गांधींची काही पत्रं, काही दस्तऐवज आणि फोटो आहेत.
 
या वस्तूंवर पाच ते सात लाख पांउंडांची बोली लागण्याची शक्यता आहे. यातील काही पत्रांमध्ये गांधी आणि वास्तुविशारद हारमन कॉलेनबॅक यांच्यामधील वादग्रस्त पत्रांचाही समावेश आहे. एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी बीबीसीला माहिती पुरवली की या सर्व वस्तू भारत आपल्या ताब्यात घेण्यासाठी बोलणी करत आहे.
भारतातर्फे बोली लावली जाईल की नाही, याबद्दल अद्याप कुठलीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या संदर्भात सॉथबे यांनी सांगितले, “गांधी-कॉलेनबॅक यांच्यातील संबंधांवर आधारित पत्रांचा १० जुलै रोजी लंडनमध्ये होणार आहे.”

First Published: Wednesday, July 4, 2012, 09:33


comments powered by Disqus