Last Updated: Wednesday, July 4, 2012, 18:58
www.24taas.com, नवी दिल्ली बंगळुरू आणि दिल्ली येथे २०१० मध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांमधील प्रमुख आरोपी फसीह मोहम्मद याला भारतात आणण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहीती केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज दिली.
मोहम्मदला सौदी अरेबियात अटक करण्यात आल्याची माहिती चिदंबरम यांनी बुधवारी नवी दिल्लीत दिली. कर्नाटक आणि नवी दिल्लीत झालेल्या घातपातप्रकरणी फसीहाचा शोध पोलीस घेत आहेत.
फसीह हा व्यवसायाने अभियंता असून भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे ठोस पुरावे हाती आले असल्याची माहिती चिदंबरम यांनी दिली .बंगळुरू येथील चिन्नस्वामी क्रिकेट स्टेडियम बाहेर झालेला स्फोट तसेच दिल्लीतील जामा मशीदीबाहेर झालेल्या गोळीबारात फसीहाचा सहभाग होता असेही त्यांनी सांगितले.
भारताने इंटरपोलकडे तक्रार केल्यानंतर त्याच्याविरोधात रेड कॉनर्र नोटीस काढण्यात आली होती. त्यानंतर सौदीमधील पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती भारताला देण्यात आली.
First Published: Wednesday, July 4, 2012, 18:58