तालिबानमध्ये मुलींना विष देऊन मारले - Marathi News 24taas.com

तालिबानमध्ये मुलींना विष देऊन मारले

www.24taas.com, काबूल
 
तालिबाननं आत्तापर्यंत एक हजार शाळकरी मुलींना विष देऊन मारल्याचं सांगण्यात येतंय. तर अनैतिक संबंधाचा आरोप ठेवून एका महिलेला क्रूरपणे मारलंय.  अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा हिंसाचार पुन्हा एकदा जगासमोर आलाय.
 
2014 मध्ये नाटो सैन्य अफगाणिस्तानमधून परतणार आहे. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानची सुरक्षाव्यवस्था पेलण्यास अफगाणिस्तान सरकार सक्षम आहे का ? असा सवाल उपस्थित होतोय.
 
तालिबानने पुन्हा दहशतवाद पसरवण्यास सुरुवात केलीए. अजूनही अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये तालिबानची हुकूमत काही भागात कायम आहे.एकंदरितच या परिस्थितीत तालिबानच्या दहशतीचा भयानक व्हिडीओ जगासमोर आलाय.
 
तालिबाननं आत्तापर्यंत एक हजार शाळकरी मुलींना विष देऊन मारल्याचं सांगण्यात येतंय. तर अनैतिक संबंधाचा आरोप ठेवून एका महिलेला क्रूरपणे मारलंय. हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो मात्र यामध्ये अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता कशाप्रकारे कार्यरत आहे हेच सिद्ध होतं.
 

First Published: Monday, July 9, 2012, 23:08


comments powered by Disqus