वादग्रस्त पत्रांसहित 'गांधी' दस्तऐवज भारतात - Marathi News 24taas.com

वादग्रस्त पत्रांसहित 'गांधी' दस्तऐवज भारतात

www.24taas.com, नवी दिल्ली 
 
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी संबंधित दस्तावेज भारतानं तब्बल सात लाख पौंडमध्ये खरेदी केलाय. लीलाव करणाऱ्या ‘सॉथबे’ या संस्थेच्या मते गांधींची काही वादग्रस्त पत्रं, काही दस्तऐवज आणि फोटो आहेत. पण, लिलावापूर्वीच भारतानं हा मौल्यवान दस्तावेज खरेदी केलाय.
 
या दस्तऐवजामध्ये महात्मा गांधी यांनी हर्मन कालेनबाक यांच्याशी असलेल्या कथित आणि वादग्रस्त संबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या पत्रांचाही समावेश आहे. जर्मन ज्यू असलेल्या कालेनबाक यांच्याकडे हा महत्त्वाचा ठेवा होता. काही दिवसांपूर्वी कालेनबाक यांच्या वंशजांनी या दस्तऐवजाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. परराष्ट्र खाते व पुरातत्व खाते यांच्याशी चर्चा केल्यानंतर भारत सरकार, साउथबी आणि कालेनबाग यांचे वंशज असलेल्या इसा सरीद या तिघांनी करार करून हा लिलाव रद्द करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी हा लिलाव होणार होता. पण त्याआधीच भारताने ‘साउथबी’ या कलादालनाशी संपर्क करून हा संग्रह तब्बल सात लाख पौंड म्हणजे १२.८० लाख डॉलर्सना विकत घेतलाय. ही कागदपत्रं आणि छायाचित्रं आता नवी दिल्लीतील राष्ट्रीय पुरातत्त्व संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
 
दक्षिण अफ्रिकेतील दिवसांपासून गांधी आणि कालेनबाक यांचे संबंध दृढ होते. काही जणांच्या मते तर त्यांच्यातील संबंध वादग्रस्त पातळीवरील होते. गांधींचे कालेनबाग यांच्याशी नक्की कुठल्या प्रकारचे संबंध होते यावर ही कागदपत्रे प्रकाश टाकतील आणि सत्य समोर येईल असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
 
 

First Published: Wednesday, July 11, 2012, 08:54


comments powered by Disqus