पाच बायकांनी केला नवऱ्यावर सामूहिक बलात्कार - Marathi News 24taas.com

पाच बायकांनी केला नवऱ्यावर सामूहिक बलात्कार

www.24taas.com, अबुजा 
 
काळ बदलल्याचे पुरावे वेगवेगळ्या घटनांमधून लोकांसमोर येतच असतात. कित्येक स्त्रिया पुरूषांच्या लैंगिक विकृतीच्या बळी ठरल्या आहेत. पतीनेही पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिला शरीरसुखासाठी जबरदस्ती केली, तर तो बलात्कार मानण्यात येतो. मात्र, नायजेरियात चक्क उलटी घटना घडली आहे. एका बिझनेसमनवर त्याच्या पाच बायकांनी सामुहिक बलात्कार केला. या अतिरेकी सेक्समुळे पतीचा मृत्यू झाला.
 
डेली मेलमध्ये दिल्या गेलेल्या एका बातमीनुसार ओगबादिबोमध्ये राहाणाऱ्या उरोका ओनोजा आपल्या सहाव्या आणि सगळ्यात तरुण पत्नीबरोबरच नेहमी सेक्स करत असे. या गोष्टीचा त्याच्या पाच बायकांना विलक्षण राग आला. एकदा ओनोजा आपल्या सहाव्या पत्नीबरोबर सेक्स करत असतानाच या पाचही बायका त्याच्या खोलीत घुसल्या आणि त्याच्या छातीवर बसल्या. त्यातील एकीने नवऱ्याच्या गळ्यावर चाकू लावला आणि त्यानंतर पाचही बायकांनी सेक्ससाठी नवऱ्याला जबरदस्ती केली.
 
नायजेरियन डेली पोस्टनुसार ओनोजाने चार पत्नींशी कसाबसा सेक्स केला. मात्र पाचव्या पत्नीशी सेक्स करताना त्याला धाप लागली, श्वास अडकला आणि त्याचा मृत्यू झाला. जेव्हा पाच बायकांना ओनोजा मेल्याचं कळलं, तेव्हा सगळ्याजणी जंगलात पळून गेल्या. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोन जणींना अटक केली. तीन बायका अजूनही फरार आहेत.

First Published: Wednesday, July 25, 2012, 18:00


comments powered by Disqus