Last Updated: Friday, August 3, 2012, 12:25
www.24taas.com, इस्लामाबाद धार्मिक सद्भावना वाढवायच्या उद्देशाने भारत आणि पाकिस्तानातील गुरूद्वारांमध्ये सेवा करणं पाकिस्तानातील एका अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. 'डॉन' या पाकिस्तानातील वृत्तपत्रात आलेल्या माहितीनुसार गुरूद्वारेत सेवा केल्याबद्दल पेशावरचे डेप्युटी ऍटर्नी जनरल मोहम्मद खुर्शीद यांना पदावरून काढून टाकण्यात आलं आहे.खुर्शीद यांच्या जागी फारूक शाह या अधिवक्त्यांना नियुक्त केलं गेलं आहे.
पेशावरमध्ये एका शीख व्यक्तीच्या झालेल्या हत्येनंतर खुर्शीद यांनी सर्वधर्मसमभावाचं दर्शन घडवण्यासाठी २०१०पासून गुरूद्वारेत सामुदायिक सेवा सुरू केली होती. अधिवक्त्यांच्या एका मंडळासोबत भारतात आलेल्य़ा खुर्शईद यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातही येणाऱ्या भाविकांचे खुर्शीद यांनी जोडे साफ केले.
भारतातील सुवर्ण मंदिरात लोकांचे जोडे साफ केल्यामुळे पाकिस्तानात परतल्यावर त्यांच्यावर टीका झाली. त्यांना पदावरून काढून टाकण्याचा प्रयत्न आधीपासून सुरू होता. आपल्या वर्तनामुळे खुर्शीद यांना पदच्युत व्हावे लागले. आपल्या विचित्र वागण्यामुळे खुर्शीद यांचं नाव आधीपासूनच खराब झालेलं होतं.
First Published: Friday, August 3, 2012, 12:25