नॅनो विमान, वजन केवळ १९८ ग्रॅम - Marathi News 24taas.com

नॅनो विमान, वजन केवळ १९८ ग्रॅम

www.24taas.com , लंडन
 
तंत्रज्ञानामुळे काही करणे शक्य होत आहे. आता तर चक्क नॅनो विमान  विकसित केले गेले आहे. याचे वजन केवळ १९८ ग्रॅम आहे. त्यामुळे ते कुठेही हातातून घेवून जाणे सहज शक्य आहे. खेळण्यातील विमानाप्रमाणे वाटणारे हे नॅनो विमान बरेच काही करू शकणार आहे. त्यामुळे या नव्या शोधामुळे या विमानाकडे लक्ष लागले आहे.
 
१९८ ग्रॅम वजनाच्या नॅनो विमानाची निर्मिती ब्रिटनने केली आहे. हे जगातील सर्वात लहान विमान असले तरी त्याची निर्मिती मोठ्या कामगिरीसाठी झाली आहे. हे विमान उपग्रहांप्रमाणे मानवरहित उडणार असून त्याचा वापर तालिबानविरुद्ध लढण्यासाठी करता येऊ शकतो, असे ब्रिटनच्या संशोधकांचे म्हणणे आहे. या नॅनोड्रोनमध्ये दोन कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे.
 
हेरगिरी करणार्‍या या विमानाला एसक्यू-४ रिकॉन असे नाव देण्यात आले आहे. अफगाणिस्तानात जवानांना वाचवण्याचे काम याद्वारे केले जाणार आहे. आधुनिक युद्धाच्या दृष्टीने हे शस्त्र महत्त्वाचे ठरणार आहे.

First Published: Thursday, August 9, 2012, 00:08


comments powered by Disqus