Last Updated: Wednesday, January 11, 2012, 12:58
www.24taas.com , जाकार्ता इंडोनेशियात आज बुधवारी ७.६ रिस्टलस्केल्स भूकंपाचा धक्का बसला. यामुळे इंडोनेशियाच्या उत्तर भागात जोराचा हादरा जाणवला. सुमात्रा बेटाजवळ ७.३ रिस्टर स्केलचे धक्के जाणवले. तर या भूकंपानंतर सुनामीचा तडाका बसण्याचा इशारा दिला आहे.
या भूकंराचा केंद्रबिंदू इंडोनेशियाच्या उत्तर भागापासून मेलबॉन शहरापासून ३५० किमी अंतरावर होता. झालेल्या जोरदार भूकंपामुळे घबराहट निर्माण झाली होती. या भूकंपात कोणतीही वित्त तसेच जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक वेळेनुसार २.३७ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच सुनामीचा धोका असल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.तसेच लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
First Published: Wednesday, January 11, 2012, 12:58