३००हून अधिक भारतीयांना वाचवण्यात यश - Marathi News 24taas.com

३००हून अधिक भारतीयांना वाचवण्यात यश

www.24taas.com, तस्कान (इटली) 
 
टायटॅनिकनंतर इटलीमध्ये कोस्टा कॉनकार्डीया अपघातामुळे सगळेच हादरले. पण या आपघातातल्या अनेकांना वाचवण्यात यश आलय, तसच ३००हून अधिक भारतीयांनाही वाचवण्यात यश आलं आहे.
 
या भारतीयांमध्ये ठाण्यातल्या कळवा भागात राहणारा मयूर कदम युवकही बचावलाय. एका खासगी कंपनीतून तो फोटोग्राफर म्हणुन या जहाजावर गेला होता. आणि हा भयंकर अपघात झाला. पण या अपघाताबद्दल त्याच्या घरच्यांना कल्पनाच नव्हती मयुरने याविषयी सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. आता ते मयुर वाचल्यामुळे आनंदात असून त्याच्या येण्याची वाट पाहात आहेत.
 
इटलीच्या तस्कान किनाऱ्यावर जहाज दगडावर आदळल्यानं मोठा अपघात झाला. यात दोन फ्रेंच प्रवासी आणि एका पेरुच्या क्रू मेंबरचा भितीनं समुद्रात उडी टाकल्यानं मृत्यू झाला आहे.  या जहाजमध्ये ६०० प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास गिगिलियो इथं हा अपघात घडला. या अपघातानंतर बचावकार्य तातडीनं सुरु करण्यात आलं. दरम्यान, अपघातग्रस्त भारतीयांना तातडीची मदत उपलब्ध करण्याचे आदेश परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी इटलीतल्या भारतीय राजदूतांना दिलेत.
 
आतापर्यंत३००हून अधिक भारतीय प्रवाशांसह ४ हजार दोनशे प्रवासी होते. यातल्या सर्व भारतीयांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना सुखरूप स्थळी पोहचवण्यात कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.  बचावकार्य सुरु असताना जहाजाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय. या ब्लॅक बॉक्समधून जहाजावरील क्रू मेंबरचं अपघाताआधीचं संभाषण समोर येण्याची शक्यता आहे.

First Published: Wednesday, January 18, 2012, 17:26


comments powered by Disqus