नाटो हेलिकॉप्टरला अपघात, सहा ठार - Marathi News 24taas.com

नाटो हेलिकॉप्टरला अपघात, सहा ठार


www.24taas.com, कंदाहार
 
दक्षिण अफगाणिस्तानात झालेल्या नाटोच्या हेलिकॉप्टर अपघातात अमेरिकेचे सहा सैनिक ठार झाले आहेत. या महिन्यात आतापर्यंत २४ सैनिक मारले गेले आहेत.  हेलिकॉप्टरला गुरूवारी रात्री अपघात झाल्याची माहिती नाटोच्या सूत्रांकडून देण्यात आली.
 
अपघातामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी तपास सुरू आहे. तसेच ही घटना घडली तेव्हा त्या परिसरात शत्रूच्या कोणत्याही हालचाली टिपल्या गेलेल्या नाही, असेही नाटोने सांगितले. हेलिकॉप्टरमध्ये लंडनच्या सैनिकांचा समावेश होता, असा दावा ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
 
यापूर्वी म्हणजेच ऑगस्ट २०११मध्ये अशाचप्रकारे हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या अपघाता अमेरिकेच्या २२  जवानांसह ३०  सैनिक मृत्युमुखी पडले होते. तर य़ा आधी  कार बॉम्ब अपघातात  सात जण ठार झाले होते.

First Published: Friday, January 20, 2012, 14:56


comments powered by Disqus