Last Updated: Friday, January 27, 2012, 12:21
www.24taas.com, इस्लामाबाद पाकिस्तानातील अबोटाबाद येथील ओसामा-बिन-लादेनच्या निवासस्थानाजवळ असलेल्या मिलिटरी ऍकॅडमीवर अज्ञात हल्लेखोराने आज सकाळी रॉकेट हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात मिलिटरी ऍकॅडमीच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यासंदर्भात अधिकार तपास करण्यात येत आहे. हल्लेखोराचे लक्ष्य मिलिटरी ऍकॅडमी होती की लादेनचे निवासस्थान याची शहानिशा करण्यात येत असल्याचे अबोटाबादचे पोलीस अधिकारी अब्दुल करीम यांनी ही माहिती देताना सांगितले.
पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये ओसामा-बिन-लादेन अमेरिकेच्या सैन्याने पाकिस्तानी सीमेत घुसून लादेनचा खातमा केला. त्यानंतर पाकिस्तानात अमेरिकाविरोध वाढला आहे. यातून हा हल्ला झाला का, याची चाचपणी सुरू आहे.
First Published: Friday, January 27, 2012, 12:21