17 वर्षीय मुलीसोबत लग्नाची बातमी शोएबनं नाकारली

Last Updated: Sunday, June 8, 2014, 09:22

रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून लोकप्रिय असणारा पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं आपण 17 वर्षीय मुलीशी विवाह करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. द एक्सप्रेस ट्रॅब्युन (The Express Tribune ) या पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार शोएब अख्तर येत्या 22 जूनला रावळपिंडी इथं 17 वर्षीय रुबाब खानसोबत निकाह करणार आहे. मात्र ट्विट करून शोएबनं हे वृत्त म्हणजे अफवा असल्याचं म्हटलंय.

हत्येच्या वेळी ओसामा होता निःशस्त्र

Last Updated: Thursday, August 30, 2012, 12:13

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूसंदर्भात नवी माहिती आता पुढे आली आहे. पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये जेव्हा अमेरिकेच्या सुरक्षा दलाने कारवाई करत ओसामाला खतम केलं, त्याक्षणी ओसामा निःशस्त्र होता. त्याला त्याच्या खोलीत असताना गोळी मारली नव्हती, तर तो जेव्हा दिवाणखान्यातून बाहेर पाहात होता, तेव्हा गोळी चालवण्यात आली होती.

लादेनच्या घराजवळ रॉकेट हल्ला

Last Updated: Friday, January 27, 2012, 12:21

पाकिस्तानातील अबोटाबाद येथील ओसामा-बिन-लादेनच्या निवासस्थानाजवळ असलेल्या मिलिटरी ऍकॅडमीवर अज्ञात हल्लेखोराने आज सकाळी रॉकेट हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.