Last Updated: Thursday, October 27, 2011, 09:18
झी २४ तास वेब टीम, दोहा लीबियामध्ये राष्ट्रीय हंगामी परिषदेच्या सैन्याला रासायनिक अस्त्रे सापडली असून, ही अस्त्रे सुरक्षितरीत्या ठेवण्यात आली असल्याची माहिती परिषदेच्या (एनटीसी) प्रवक्त्याने सांगितले.
या संबंधी एका इंग्रजी वृत्तपत्रात गेल्या 22 आॅक्टोबरली प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे, बंडखोर फौजांना त्रिपोलीच्या दक्षिणेकडे सातशे किलोमीटरवर असलेल्या जुफ्रा या वाळवंटी प्रदेशात रासायनिक अस्त्रे सापडली आहेत.
लीबियामध्ये ९.५ टन 'मस्टर्ड वायू' गुप्त ठिकाणी ठेवण्यात आला आहे. बंडखोर फौजांनी हीच अस्त्रे जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. ही अस्त्रे गडाफीच्या सत्तेदरम्यानची आहेत, आता ती ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे, असे एनटीसी'च्या प्रवक्त्याने परिषद व 'नाटो'च्या प्रतिनिधींमध्ये कतार येथे झालेल्या बैठकीत सांगितले.
First Published: Thursday, October 27, 2011, 09:18