पाकिस्तानात अय्यर यांचा सईदवर हल्लाबोल - Marathi News 24taas.com

पाकिस्तानात अय्यर यांचा सईदवर हल्लाबोल

www.24taas.com, इस्लमाबाद
 
पाकिस्तानमधील एका टीव्ही शो मध्ये भारतीय खासदार मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर जमात-उद-दावाचे प्रमुख हाफिज महम्मद सईद प्रचंड संतापले आहेत.
 
इस्लामाबाद येथे होत असलेल्या एका टीव्ही शोमध्ये स्टुडियोमध्ये मणिशंकर अय्यर बोलत असताना शोच्या सूत्रसंचालकाने २००८च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार सईद यांना फोन लावला. सईद यांनी फोनवर असे म्हटले की भारताने अजूनही पाकिस्तानचे अस्तित्व मान्य केलेलं नाही. भारताला चांगलं राष्ट्र म्हणवून घ्यायचा अधिकार नाही. कारण भारताने अद्यापही काश्मीर प्रश्न सोडवलेला नाही. भारताची सध्याची धोरणं पाकिस्तानचं नुकसान करणारी आहेत.
 
सईद यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना मणिशंकर अय्यर म्हणाले की सईद यांना अटक करून दहशतवाद विरोधी न्यायालयात हजर करायला हवे. दोन्ही देशांत हाफिज सईद सारखे काही लोक आहेत, ज्यांना दोन देशामधील शांतता नको आहे. पण, सर्वसामान्य माणसाला भारत- पाकिस्तानातील समेट हवी आहे.

First Published: Friday, February 3, 2012, 19:56


comments powered by Disqus