Last Updated: Wednesday, February 15, 2012, 12:47
www.24taas.com, कराची प्रख्यात स्तंभलेखिका शोभा डे यांच्या मते सौंदर्याच्या बाबतीत भारतीय स्त्रियांची पाकिस्तानी स्त्रियांशी तुलनाच होऊ शकत नाही. ६४ वर्षीय शोभा डे या सध्या पाकिस्तानातल्या कराचीमधील द्विदिवसीय 'कराची साहित्य महोत्सवा'ला उपस्थित आहेत. आणि त्यांच्या मते पाकिस्तानी स्त्रिया या भारतीय स्त्रियांपेक्षा खूपच सुंदर असतात.
शोभा डे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या की त्यांनी कराचीत आल्यापासून बऱ्याच स्थळांना भेट दिली आहे. कॅफे फ्लो मध्ये त्यांनी भोजन घेतलं तर लॉनमधअये खरेदीसाठी त्या गेल्या होत्या. याचबरोबर डे म्हणाल्या, “मला मुलतानी प्लेट्स घ्यायच्या आहेत, पण मला अजून तरी त्या मिळाल्या नाहीत. इतवार बाजारमध्ये त्या मिळतील असं मला आता कुणीतरी सांगितलं आहे.”
याचबरोबर भारतीय सोशलाइट्सना पाकिस्तानातील स्त्रियांच्या कपड्यांमधील नजाकत, कुर्त्यांमधली विविधता याबद्दल किती कुतुहल आहे, हे देखील शोभा डे यांनी सांगितले. याचबरोबर शुक्रवारी रात्री फार्महाऊसवर संगीत आणि मेहेंदीचा आनंद घेण्याचाही डे यांचा विचार आहे.
First Published: Wednesday, February 15, 2012, 12:47