मी माफी मागणार नाही- शोभा डे

Last Updated: Thursday, August 1, 2013, 18:27

स्वतंत्र तेलंगणाच्या घोषणनंतर मुंबई आणि महाराष्ट्रही स्वतंत्र होऊ शकतात, अशा अर्थाचं ट्विट शोभा डे यांनी केलं होतं. या विरोधात शिवसैनिकांनी शोभा डेंच्या घरासमोर आज निदर्शन केलं. मात्र आपण माफी मागणार नसल्याचं शोभा डे यांनी म्हटलं आहे.

शोभा डेंचा मेंदू डोक्याच्या बाहेर- आव्हाड

Last Updated: Thursday, August 1, 2013, 07:59

शोभा डेंचा मेदू डोक्याचा बाहेर असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

ही पेज थ्री पार्टीतली ओकारी - शिवसेना

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 15:49

महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करण्याची भाषा म्हणजे `ही पेज थ्री पार्ट्यांमधली ओकारी आहे` अशा भाषेत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शोभा डे यांना सुनावलंय.

शोभा डे, घटस्फोट घेण्याइतकं हे सोपं नाही - राज

Last Updated: Thursday, August 1, 2013, 09:00

मुंबईचं वेगळं राज्य का होऊ शकत नाही, असा प्रश्न विचारत लेखिका शोभा डे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. हे घटस्फोट घेण्याइतकं सोप आहे का?, असं राज म्हणालेत.

`माझ्यासोबत ६५ व्या वर्षीही छेडछाड`

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 11:53

भारतातील महिलांचं जीवन वाटतं तितकं सोपं आणि सुखद नाही, असं मत व्यक्त केलंय प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी... हे स्पष्ट करताना त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेचाही खुलासा केलाय.

पाक स्त्रिया भारतीय स्त्रियांपेक्षा सुंदर- शोभा डे

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 12:47

प्रख्यात स्तंभलेखिका शोभा डे यांच्या मते सौंदर्याच्या बाबतीत भारतीय स्त्रियांची पाकिस्तानी स्त्रियांशी तुलनाच होऊ शकत नाही. ६४ वर्षीय शोभा डे या सध्या पाकिस्तानातल्या कराचीमधील द्विदिवसीय 'कराची साहित्य महोत्सवा'ला उपस्थित आहेत.