मायकल जॅक्सनची मोहिनी ! - Marathi News 24taas.com

मायकल जॅक्सनची मोहिनी !

झी २४ तास वेब टीम, न्यू यॉर्क
पॉप गायक मायकल जॅक्सनची मोहिनी त्याच्या मृत्यूनंतरही अद्याप कायम आहे कारण मृत सेलिब्रिटींच्या उत्पन्नाची यादी नुकतीच फोर्ब्स डॉट कॉम या संकेतस्थळाने प्रसिध्द केली असून त्यात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मायकल पहिल्या स्थानावर आहे. पॉप संगीताचा बादशहा मायकल जॅक्सनने आपल्या अनोख्या संगीताने आणि नृत्याने जगावर मोहिनी घातली. त्याच्या डान्सिंग स्टाईलची कॉपी करण्याचा आजही अनेक जण प्रयत्न करतात मात्र त्याच्या सम तोच असं हे वक्तव्य त्याच्या मृत्यूनंतरही त्यानं सार्थ ठरवलंय. मायकलची जादू आजही फक्त संगीतातच कायम नाहीए तर मृत्यूनंतरही मायकलने नवा विक्रम केलाय आणि हा विक्रम आहे गडगंज संपत्तीचा. नुकतीच फोर्ब्स डॉट कॉम या संकेतस्थळाने मृत सेलिब्रिटींच्या उत्पन्नाची यादी प्रसिध्द केली असून त्यात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मायकल पहिल्या स्थानावर आहे.
 
गेल्या वर्षभरात मायकलचे अल्बम आणि इतर वस्तूंची विक्री करून सुमारे १७ कोटी डॉलरची कमाई झालीय. मायकलच्या खालोखाल रॉक एन् रोलचा सम्राट एल्वीस प्रेस्ली असून त्याची
 
त्याच्या वस्तूंच्या विक्रीची कमाई साडेपाच कोटी डॉलरच्या घरात आहे. तर या यादीत तिस-या स्थानावर आहे ती १९६२ मध्ये अवघ्या ३६ व्या वर्षी मृत पावलेली हॉलिवूडची सौंदर्यवती मर्लिन मेन्रो, तिच्या वस्तूंची विक्री करुन सुमारे दोन कोटी ७० लाख डॉलर ची कमाई झालीय.  जिवंत पॉप संगीतकार आणि गायकांच्या उत्पन्नाच्या यादीही मायकलचे स्थान दुस-या स्थानावर राहिलंय....
 
मायकल जॅक्सनचे अल्बम आणि इतर वस्तूंची विक्री गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढलीय त्यामुळेच मृत्यूनंतरही मायकलची जादू आजही कायम आहे हेच अधोरेखित होतंय.

First Published: Friday, November 4, 2011, 18:25


comments powered by Disqus