बगदादमधील बॉम्बस्फोटात २२ ठार - Marathi News 24taas.com

बगदादमधील बॉम्बस्फोटात २२ ठार

www.24taas.com,  बगदाद 
 
 
बगदादमध्ये अजूनही अशांतता खदखदत आहे. पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी आज गुरुवारी सकाळी करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात २२  नागरिक ठार झालेत.
 
 
करदाहमध्ये सकाळी गर्दीच्या वेळी बॉंबस्फोट घडवून आणण्यात आला. त्यात २२ ठार, तर २४  जण जखमी झाले. या जखमींपैकी काहीजणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांता आकडा वाढण्याची शक्यता आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींना जोरदार हादरा बसला.
 
 
या घटनेनंतर शहरात आणखी चार ठिकाणी बॉंब आढळून आले आहेत. यातील सर्वात भयंकर बॉंबस्फोट शिया पंथीय स्थायिक असलेल्या करदाह या शहरात करण्यात आला. जखमींवर जवळीलच अल नाफिज आणि अल रहिबात या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

First Published: Thursday, February 23, 2012, 15:16


comments powered by Disqus