Last Updated: Monday, November 7, 2011, 05:33
झी २४ तास वेब टीम, मुंबई बहारिनचा अल हद्दाद सामी हा मुंबईत झालेल्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत 'चॅम्पियन ऑफ चॅम्पयिन्स' ठरला आहे. अंधेरीच्या शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात पार पडलेल्या 'मिस्टर युनिव्हर्स' स्पर्धेत एकूण ९ वजनी गटातील विजेंत्यामधून 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'ची निवड करण्यात आली. यामध्ये ९५ किलो वजनी गटातील सामीने बाजी मारली. सामीने यापूर्वी बहारीन, यूएई, कुवैत, कतार, अरब गोल्फ, अशियाई स्पर्धेत 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'चा किताब पटकावलाय.
या स्पर्धेत महाराष्ट्रचे एकमेव आव्हान असलेल्या आशिष साखरकरने ७५ किलो वजनी गटात ब्राँझ मेडल पटकावलं. तर भारताने विविध वजनी गटात एकूण पाच मेडल्सची कमाई केलीय. भारताकडून मुस्ताक, हिरा लाल, इब्रान्ता, महेसवरन आणि आशिष साखरकर यांनी विविध गटात मेडल्सची कमाई केली आहे.
First Published: Monday, November 7, 2011, 05:33