Last Updated: Tuesday, November 8, 2011, 06:29
झी २४ तास वेब टीम, टोकियो दक्षिण जपानमधील ओकिनावा बेटांना आज सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर ६.८ इतकी भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू ओकिनावा बेटांपासून २२० किमी अंतरावर होता. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नसून, कोणतीही जिवितवा वित्त हानीचे वृत्त नाही.
जपानमध्ये ११ मार्चला झालेल्या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीमध्ये सुमारे २० हजार नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या भूकंपाच्या धक्क्यामुळे जपानमधील नागरिकांना पुन्हा एकदा या घटनेची आठवण झाली.
First Published: Tuesday, November 8, 2011, 06:29