Last Updated: Wednesday, March 14, 2012, 15:04
www.24taas.com, इस्लामाबाद 'तहरीक-ए-तालिबान'चे दोन भागात विभाजन झाल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी म्हटले आहे. तालिबानची सरकारशी चर्चा करण्याच्या मुद्यावरून तालिबानी गटात वाद झाले होते आणि त्यातूनच तालिबान फुटून दोन भाग बनले असल्याचं बोललं जात आहे.
अर्थातच, मलिक यांनी या संदर्भात अधिक बोलण्यास नकार दिला आहे आणि यामागची कारणं सांगण्यासही ते तयार नाहीत. मलिक यांनी मीडियाशी बोलताना असं स्पष्ट केलं की, चारही प्रांतांचे पोलीस दल आता आतंकवाद विरोधक दल स्थापन करणार आहे.
गृहमंत्रालयाने या सर्व प्रांतांतील अतिरेकी घडामोडींचे रिपोर्ट्स मागवले असल्याचे मलिक यांनी सांगितले.
First Published: Wednesday, March 14, 2012, 15:04