Last Updated: Saturday, March 24, 2012, 19:11
www.24taas.com, बीजींग चीनमधल्या यान्गचेन्ग किनाऱ्यावर चार व्हेल माशांचा मृत्यू झालाय. हे चारही व्हेल इथल्या स्थानिक मच्छिमारांना अर्धमेल्या अवस्थेत किनाऱ्यावर आढळून आले होते.
मच्छिमारांनी तातडीनं फिशींग ऑथरिटीजना मदत मागितली. प्रशासनाची फौज किनाऱ्यावर दाखल झाली आणि व्हेल्सना वाचवण्याचे प्रयत्नही सुरू झाले. एवढ्यात भरतीची एक मोठी लाट आली आणि व्हेल्स समुद्रात ढकलले गेले. यामुळे व्हेल माशांचे प्राण वाचण्याची शक्यता निर्माण झाली होती. या व्हेल्सना खोल समुद्रात नेण्याचेही प्रयत्न सुरू होते.
मात्र, १६ मीटर लांब आणि ३० टन वजनाच्या अतिशय अशक्त झालेल्या या व्हेल्स पाण्याअभावी तडफडून मेले. कटलफिशचा पाठलाग करत ते किना-यावर पोहचले असावेत, असा अंदाज बांधण्यात येतोय. या चारही व्हेलना ताबडतोब किनाऱ्याजवळच पुरण्यात आलंय.
First Published: Saturday, March 24, 2012, 19:11