झिम्बाब्वे पुरुषांना महिलांकडून बलात्काराची भीती - Marathi News 24taas.com

झिम्बाब्वे पुरुषांना महिलांकडून बलात्काराची भीती

www.24taas.com, लंडन

झिम्बाब्वेमध्ये आता सौंदर्यवतींच्या टोळ्या पुरुषांवर बलात्कार करत असल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांनी दिल्या आहेत. झिम्बाब्वेतील पारंपारिक जुजु संस्कारासाठी पुरुषांच्या वीर्य गोळा करण्यासाठी तिथल्या महिला हा उद्योग करत असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. जुजु संस्कारांमुळे भाग्योदय होतं असं तिथे समज आहे.
 
सूझान दिलवायो या स्थानिक महिलेने दावा केला आहे की तिने एका पुरुषांच्या चमुला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवली तेंव्हा त्यांनी बलात्काराच्या भीतीने नकार दिल्याचं डेली मेलने वृत्त दिलं आहे. आता पुरुष महिलांना घाबरु लागल्याचं तसंच आमचा तुझ्यावर विश्वास नाही त्यामुळे तुझ्यासोबत येणार नाही असं त्या पुरुषांनी आपल्याला म्हटल्याचं सुझान म्हणाली.
 
पुरुषांना अंमली गुंगीचे औषध देऊन किंवा बंदुकीचा किंवा चाकुचा धाकं स्त्रियांनी दाखवून बलात्कार केल्याचं वृत्त आहे. एका पुरुषाला तर जीवंत सापाची भीती दाखवून संभोग करण्यास भाग पाड्लायंची भन्नाट बातमी आहे. बळी पडलेल्या पुरुषांना कंडमोशिवाय उत्तेजक देऊन सतत संभोग करायला भाग पाडण्यात येतं आणि त्यांतर रस्त्याच्या बाजुला फेकून दिले जात असल्याचं प्रकार समोर आलं आहेत.
 
नोव्हेंबर महिन्यात तीन बहिणी आणि त्यापैकी एकीच्या मित्राने पुरुषांच्या एका चमुवर वीर्य गोळा करण्यासाठी हल्ला चढवल्याने सध्या हरारे न्यायालयात केस चालू आहे. या तीन बहिणींच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तेंव्हा त्यांच्या गाडीत ३१ वापरलेले कंडोम सापडले. आता त्यांच्यावर लैंगिक हल्ला चढवल्याच्या केसेस दाखल करण्या आल्या आहेत. झिम्बाब्वेमध्ये पुरुषावर बलात्काराचा गुन्हा नोंदवता येत नाही.
 

First Published: Sunday, March 25, 2012, 21:51


comments powered by Disqus