सेक्स स्कँडल: कोलंबियन एस्कॉर्टचा पर्दाफाश - Marathi News 24taas.com

सेक्स स्कँडल: कोलंबियन एस्कॉर्टचा पर्दाफाश

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
सध्या सोशल नेटवर्क साइट्सवर दिसायला लागलेला हा फोटो अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसमधील सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या एका मुलीचा आहे.
 
न्यू यॉर्क दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार या फोटोमध्ये डायना नामक ही युवती कॅमेरामध्ये आपले कमानदार शरीराचं प्रदर्शन मांडत आपल्या स्तनांशी खेळताना दिसत आहे. तसंच केसही उडत आहेत. जेव्हा सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या सिक्रेट सर्व्हिसमधील दोन अधिकाऱ्यांची नावं प्रकाशात आली, तेव्हा या मुलीची ओळख पटली.
या स्कँडलमधील अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय, तर एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. एका अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस फर्मावण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना ‘डायना’ची ओळख पटल्यावर डायनानेही मौन सोडलं. ९ वर्षे वयाच्या मुलाची आई असणाऱ्या डायनाला अधिकाऱ्यांनीच कार्टेजिना येथे बोलावले होते. आणि तुटपुंज्या रकमेत एका अधिकाऱ्याबरोबर शैय्यासोबत करण्याबद्दल विचारण्यात आलं होतं, असं एका एस्कॉर्टने सांगितलं. या सेक्स स्कँडलमुळे जगभरात खळबळ माजली आहे.
 

First Published: Friday, April 20, 2012, 19:08


comments powered by Disqus