Last Updated: Saturday, November 26, 2011, 15:54
झी 24 तास वेब टीम, मुंबईनाटोच्या हेलिकॉप्टर्सनी वायव्य पाकिस्तानातील लष्करी ठाण्यावर चढवलेल्या हल्ल्यात 28 सैनिक मारले गेले. त्यानंतर पाकिस्तान सरकारने अफगाणीस्तानातील
नाटोच्या फौजांना पाकिस्तानातुन जाणारा महत्वाचा रसदीचा मार्ग बंद केला आहे. अमेरिकेच्या सील कमांडोंनी मे महिन्यात अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनचा खातमा
केल्यानंतर पाकिस्तान आणि अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला. पाकिस्तानने हा आपल्या सार्वभौमत्वारवचा हल्ला असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने शनिवारच्या हल्ल्याच्या तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
अफगाण सीमेपासून 2.5 किमी अंतरावर असलेल्या सलाला लष्करी तपासणी चौकीवर नाटोच्या हेलिकॉप्टर्सनी चढवलेल्या हल्ल्यात 28 पाक सैनिक ठार झाले आणि 11 जण जखमी झाले आहेत. हा हल्ला पहाटे दोनच्या सुमारास मोहमंदमधील बाईझाई भागात झाला. या भागात पाक फौजात तालिबानशी लढत आहेत. अफगाणीस्तानात रसद घेऊन जाणारी वाहने जामरूडजवळ थांवण्यात आली असून जवळपास 40 ट्रक परत गेले असल्याचं वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं. अफगाणीस्तानातील नाटोच्या फौजांना जवळपास 49 टक्के रसद पाकिस्तान मार्गे जात असल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते.
First Published: Saturday, November 26, 2011, 15:54