Last Updated: Tuesday, November 29, 2011, 06:24
झी 24 तास वेब टीम, टोकियो जपानी तरुणाई विलक्षण एकटेपणाने घेरलेली आहे. अठरा ते 34 वर्षे वयाचे 61 टक्के तरुण आणि पन्नास टक्के तरुणी एकेकटे राहत असल्याचे सरकारने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात दिसले आहे.
'लव्ह इन टोकिया' हे जपानमध्ये फक्त परदेशी नागरिकांना आकर्षित करणारे 'स्लोगन' ठरते आहे. प्रत्यक्षात एकटेपणाच पसंत आहे आणि जोडीदाराची आसही राहिलेली नाही. 'बीबीसी' या सर्वेक्षणाचे वृत्त दिले आहे. जपानमध्ये जन्मदर जगात सर्वांत कमी आहे. या शतकाच्या मध्यावर जपानी लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे.
दर पाच वर्षांनी सरकार स्त्री-पुरूष संख्या आणि लग्न या विषयावर सर्वेक्षण करते. पैसे नसल्यामुळे तरुणाई जोडीदार शोधण्याच्या फंदातच पडत नसल्याचे नव्या सर्वेक्षणात आढळले आहे. वयाची पंचविशी उलटल्यावर चांगला जोडीदार मिळणे अवघड बनत असल्याने नंतर नादच सोडल्याचेही अनेकांनी सर्वेक्षणात सांगितले आहे. 35 ते 39 वर्षे वयोगटातील एकचतुर्थांश लोकांनी आयुष्यात कधीच लैंगिक अनुभव घेतला नसल्याची माहितीही सर्वेक्षणातून पुढे आली.
First Published: Tuesday, November 29, 2011, 06:24