Last Updated: Wednesday, May 9, 2012, 18:13
www.24taas.com, काठमांडू
नेपाळमध्ये अन्नपूर्णा पर्वतरांगांवर झालेल्या हिमवादळामुळे सेती नदीला पूर आलेला आहे. या पूरात आत्तापर्यंत २६ जणांचा बळी गेलाय. त्यापैकी काही मृत शरीर मंगळवारी पोलिसांच्या हातात लागले पण त्या मृतदेहांची ओळख मात्र अजूनही पटू शकलेली नाही.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ३ विदेशी नागरिकांसहीत जवळजवळ ४० नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. पण त्यांच्या वाचण्याची शक्यता मात्र फार कमी आहे. बेपत्ता लोकांना वाचवण्यासाठी पोलिसांची शोधमोहिम सुरू आहे. पोलिसांच्या मदतीसाठी नेपाळचं लष्कर, सशस्त्र पोलिस दल घटनास्थळी उपस्थित झालंय.
First Published: Wednesday, May 9, 2012, 18:13