Last Updated: Monday, January 27, 2014, 14:50

www.24taas.com, वृत्तसंस्था, हेनन, चीन
प्रेम म्हणजे एकमेकांचा विचार करणं... पण याच प्रेमाचं सध्या विकृत रूप पाहायला मिळतंय. लग्नासाठी प्रेयसीनं नकार दिला म्हणून एका विकृत प्रियकरानं तिचं अपहरण करून बंदी बनवलं.
चीनच्या हेनन प्रांतातील ही घटना आहे. तरुणानं धारदार शस्त्रानं तरुणीचं अपहरण केलं आणि सर्वांसमोर तिला छतावर घेऊन गेला. तब्बल पाच तास हे थरार नाट्य सुरू होतं. हे कमी होतं की काय म्हणून वेड्या तरुणानं स्वत:चे कपडे उतरवलेच शिवाय प्रेयसीला धमकावून तिलाही न्यूड केलं.
या ३२ वर्षीय तरुणाचं नाव लिन सांगण्यात येतंय. या संपूर्ण नाट्यादरम्यान पोलिसांनी तरुणाला समजावण्याचे खूप प्रयत्न केले. त्याच्या नातेवाईकांनाही बोलवलं. मात्र त्यानं कोणाचंही काहीच ऐकलं नाही. काही वेळानंतर तर त्यानं तरुणीसोबत पळून जाण्यासाठी कारची मागणी केली.
या संपूर्ण घटनेदरम्यान वारंवार तो तरुणीला मारण्याची धमकी देत होता. यात पाच तास गेले. मग मात्र पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी घेरलं आणि सापळा रचून त्याला पकडलं. पोलिसांनी तरुणीला सोडवून लिनला अटक केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ
First Published: Friday, January 24, 2014, 12:24