पावसात भिजल्या म्हणून बहिणींवर गोळ्या झाडल्या , Two teenage sisters shot dead in Pakistan for dancing in the rain

पावसात भिजल्या म्हणून बहिणींवर गोळ्या झाडल्या

पावसात भिजल्या म्हणून बहिणींवर गोळ्या झाडल्या
www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद

पावसात भिजत बागडायला कोणाला नाही आवडत, पण पाकिस्तानमध्ये दोन सख्ख्या बहिणींना असंच भिजणं आणि बागडणं महागात पडलंय. केवळ पावसात भिजल्या म्हणून त्यांना गोळ्या झाडून ठार करण्यात आलंय.

पाकिस्तानातल्या गिलगिट प्रांतातील चिलास शहरात ही धक्कादायक घटना घडलीय. नूर बसरा आणि नूर शेजा या दोन बहिणींनी पावसात भिजताना आपला व्हिडिओ शूट केला. मोबाईल दुरुस्तीसाठी हा मोबाईल दिला गेला त्यानंतर हा व्हिडिओ साऱ्या शहरभर पसरला आणि या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे समाजात परिवाराचीही निंदा-नालस्ती झाली.

यामुळे या दोघींच्या चिडलेला सावत्र भाऊ खुटोरे यानं आपल्य दोन्ही बहिणींची गोळ्या झाडून हत्या केली. कुटुंबाचा अपमान सहन न झाल्यानं आपल्या चार मित्रांच्या मदतीनं दोन बहिणींसहीत त्यांच्या आईचीही हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय. खुटोरे याला अद्यापही अटक झालेली नाही.

पाकिस्तानमध्ये अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी गेल्यावर्षी पाकमधील खेयिस्तान गावात लग्नात नृत्य करणाऱ्या चार महिलांची हत्या करण्यात आली होती.

First Published: Tuesday, July 2, 2013, 12:11


comments powered by Disqus