बराक ओबामांच्या आयफोन वापरण्यावर बंदी!US President Barack Obama says he is not allowed an iPhone

बराक ओबामांच्या आयफोन वापरण्यावर बंदी!

बराक ओबामांच्या आयफोन वापरण्यावर बंदी!
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरू दिला जात नसल्याचं स्पष्ट झालंय. व्हाईट हाऊसमध्ये युवकांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ओबामा बोलत होते. त्यावेळी त्यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरण्यास बंदी असल्याचं म्हटलं.

ओबामांना केवळ अॅपलचा टॅब आणि आयपॅड वापरतात. त्याचबरोबर ओबामांचा वैयक्तीक ई-मेल पत्ता मोजक्याच दहा जणांना देण्यात आला आहे.

ओबामा म्हणाले, ``माझ्या दोन मुलं साशा आणि मलिया या अॅपलच्या आयफोनवर बराच वेळ घालवितात. पण, मला सुरक्षेच्या कारणास्तव आयफोन वापरू दिला जात नाही. मी फक्त अॅपलचा टॅबलेट कॉम्प्युटर आणि आयपॅड वापरतो. मला माझ्या फोनचे बिल किती येते, हे सुद्धा माहित नाही.``


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 5, 2013, 14:56


comments powered by Disqus