`ब्लॅकबेरी`चा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त `स्मार्ट फोन`

Last Updated: Monday, June 16, 2014, 12:46

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ब्लॅकबेरी सर्वात कमी किंमतीचा स्मार्ट फोन बाजारात आणणार आहे, या फोनचा हॅण्डसेट ब्लॅकबेरीच्या Z3 सिरीजमध्ये असणार आहे.

खुशखबर... स्मार्टफोन झाले स्वस्त!

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 17:52

खुशखबर... खुशखबर... खुशखबर... स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट प्रेमींनो, जर का तुम्ही चांगल्या स्मार्टफोन कमीत कमी किंमतीत घेण्यासाठी थांबला असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... बाजारात स्मार्टफोनच्या किंमतीत चांगलीच घसरण झालीय. काही प्रॉडक्ट तर चक्क अर्ध्या किंमतीत उपलब्ध झालेत.

ब्लॅकबेरी झेड ३० स्वस्त होणार!

Last Updated: Saturday, March 29, 2014, 13:44

ब्लॅकबेरीच्या झेड १० या मोबाईल फोनला चांगलाच प्रतिसाद मिळत असतानाच, ब्लॅकबेरी इंडिया ही कंपनी ५ इंच स्क्रीनचा `झेड ३०` बाजारात आणत आहे. ब्लॅकबेरीचा झेड १० नंतर `झेड ३०` हा कमीकिमतीत मिळणार असल्याचं समजतंय.

किंमत घटल्यानंतर `ब्लॅकबेरी Z-१०`चा स्टॉकच संपला

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 20:04

`ब्लॅकबेरी`च्या झेड १० मोबाईल फोनचा स्टॉकच संपुष्टात आलाय. कंपनीनं या फोनची किंमत दोन टप्प्यांत जवळजवळ ६० टक्क्यांनी कमी केली होती.

ब्लॅकबेरीच्या क्यू ५ ची किंमत २० टक्क्यांनी कमी

Last Updated: Monday, January 6, 2014, 19:01

मोबाईल हॅण्डसेट बनवणारी कंपनी ब्लॅकबेरीने विक्री वाढवण्यासाठी आज स्मार्टफोन क्यू ५ ची किंमत २० टक्क्यांनी कमी केली आहे. या फोनची किंमत आता १९ हजार ९९० रूपये आहे, यापूर्वी या फोनची किंमत २४ हजार ९९० रूपये ठरवण्यात आली होती.

स्मार्टफोन हरवला.. तर आता टेन्शन नको

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 13:26

स्मार्टफोन ही आजकाळाची गरज झाली आहे. एखाद्या पर्सनल सेक्रेटरीप्रमाणे आपली बरीचशी कामे स्मार्टफोन हा हलकी करतो. त्यात आपला महत्त्वपूर्ण डेटा असतोच, पण त्याबरोबरच कॉन्टॅक्ट नंबर्सही स्टोर केलेले असतात. डेटा बॅंकअपची सुविधा असली तरी आपला स्मार्टफोन अचानक हरवला तर आपला डेटा चोराला मिळून तो त्याचा गैरवापर करण्याची भीती आपल्याला नक्कीच वाटते. त्यामुळे ब्लॅकबेरी या मोबाईल कंपनीने यावर तोडगा शोधला आहे.

बराक ओबामांच्या आयफोन वापरण्यावर बंदी!

Last Updated: Thursday, December 5, 2013, 14:56

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरू दिला जात नसल्याचं स्पष्ट झालंय. व्हाईट हाऊसमध्ये युवकांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ओबामा बोलत होते. त्यावेळी त्यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरण्यास बंदी असल्याचं म्हटलं.

ब्लॅकबेरीचा नवीन स्मार्टफोन टच पोर्शे डिजाईन पी ९९८२ लाँच

Last Updated: Friday, November 22, 2013, 10:48

स्मार्टफोनच्या जमान्यात कॅनडाच्या हँडसेट कंपनी ब्लॅकबेरीनं पोर्शे डिजाइनसह एक नवीन आणि पूर्णपणे टचस्क्रिन असलेला स्मार्टफोन लाँच केलाय. पोर्शे डिझाइनचा पी ९९८२ हा लक्झरी स्मार्टफोन आहे. मात्र या स्मार्टफोनची किंमत किती ते अजूनही सांगण्यात आला नाहीय.

`ब्लॅकबेरी`ला नवीन उत्साहाची गरज?

Last Updated: Friday, November 8, 2013, 08:22

‘ब्लॅकबेरी’ आणि ‘बीबीएम’ हे काही दिवसांपर्यंत एक ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरले होते. ऑफिसमध्ये वरच्या पोझिशनवर काम करणाऱ्या मोजक्याच लोकांना ईमेल आणि मॅसेजिंगसाठी हे फोन सोईचे ठरत होते. पण...

अॅन्ड्रॉईड-आयओएसवर डाऊनलोड करा बीबीएम!

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 16:39

आत्तापर्यंत केवळ ‘ब्लॅकबेरी’ मोबाईलसाठी उपलब्ध असलेली बीबीएम ही सुविधा आता ‘अॅन्ड्रॉईड’ आणि ‘आयओएस’मध्येही सुरू झालीय. ब्लॅकबेरीनं ही सुविधा नुकतीच लॉन्च केलीय.

नोकियानंतर आता ब्लॅकबेरी कंपनीची विक्री

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 11:42

काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्टने नोकिया सारखी मोबाईल कंपनी विकत घेतल्यानंतर आता तशीच काहीशी वेळ ब्लॅकबेरीवर आल्याचं समजतंय. फेअरफॅक्स नावाच्या कॅनडाच्या कंपनीनं ब्लॅकबेरी विकत घेण्याची तयारी सुरु केली आहे.

खूशखबर!!! ब्लॅकबेरीचं बीबीएम अँड्रॉईड आणि आयफोनवर

Last Updated: Thursday, September 19, 2013, 15:38

स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी ब्लॅकबेरी मैदानात उतरतंय. आयफोन आणि अँड्रॉईडच्या स्पर्धेत काहीसं मागं पडलेल्या ब्लॅकबेरीनं आता आपलं वैशिष्ट्य असलेली बीबीएम म्हणजे ब्लॅक बेरी मेसेंजर ही सेवा आयओएस (i OS) आणि अँड्रॉईड (Android) या ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलाय.

`ब्लॅकबेरी क्यू-१०` भारतात लॉन्च...

Last Updated: Thursday, June 6, 2013, 16:53

ब्लॅकबेरीनं आपला नवीन स्मार्टफोन ब्लॅकबेरी ‘क्यू-१०’ भारतात लॉन्च केलाय. या फोनची किंमत भारतात ४४,९९० रुपये जाहीर करण्यात आलीय.

ब्लॅकबेरी-१०ला सोनीच्या ‘एक्सपेरिया’ची टक्कर

Last Updated: Thursday, March 7, 2013, 14:06

मोबाईल क्षेत्रात दिवसागणिक क्रांती होत आहे. नवनविन तंत्रज्ञाचा वापर करून प्रत्येक कंपनी आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. नोकीया कंपनीचे दिवाळं निघाल्यानंतर पुन्हा भरारी मारण्यासाठी नोकीया कामाला लागली आहे. आता तर सोनी कंपनीने ब्लॅकबेरी-१०ला टक्कर देण्यासाठी बाजारात ‘एक्सपेरिया’ हा नवा मोबाईल आणलाय.

बाजारात आला ब्लॅकबेरी झेड-10, किंमत ४३,४९०

Last Updated: Monday, February 25, 2013, 21:26

ब्लॅकबेरीने आपला बहुप्रतिक्षेत असलेला स्मार्टफोन झेड १० सोमवारी भारतात लॉन्च केला. भारतात या फोनची किंमत ४३,४९० रुपये आहे. कंपनीने या फोनमध्ये आपल्या ब्लॅकबेरी -१० या ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर केला आहे.

एकाच दिवशी धडकणार `ब्लॅकबेरी`चे १० नवे स्मार्टफोन...

Last Updated: Thursday, February 21, 2013, 12:27

स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी ‘ब्लॅकबेरी’ येत्या २५ फेब्रुवारीला भारतात एकच धमाका उडवून देणार आहे. एकाच दिवशी ब्लॅकबेरी आपल्या ताफ्यातील १० नवे स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे.

‘रिम’ झाली ब्लॅकबेरी; ब्लॅकबेरी – १० लॉन्च!

Last Updated: Thursday, January 31, 2013, 11:55

‘ब्लॅकबेरी’ मोबाईल हॅन्डसेट बनवणाऱ्या ‘रिसर्च इन मोशन’ म्हणजेच ‘रिम’ या कंपनीनं आपलं नाव बदलून आता ‘ब्लॅकबेरी’ हेच नाव धारण केलंय.

ब्लॅकबेरीचा स्वस्त फोन लाँच

Last Updated: Thursday, April 19, 2012, 18:33

ब्लॅकबेरी बनवणाऱ्या रिसर्च इन मोशन (RIM)ने आपला स्मार्टफोन कर्व्ह ९२२० आज लाँच केला. या स्मार्टफोनची किंमत १०,९९० रुपये आहे. भारतीय बाजारात आपली स्थिती अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने स्वस्तात नवा फोन विक्रीस उपलब्ध केला आहे.

खपासाठी ब्लॅकबेरी हँडसेट्स स्वस्त

Last Updated: Thursday, March 29, 2012, 12:53

तुम्हाला ब्लॅकबेरी हँडसेट्स घ्यायचा असेल तर आता ते शक्य होणार आहे. मात्र, थोडावेळ थांबलात तर तुम्हच्या खिशाला ते परवडणारे आहे. कारण कंपनीने सामान्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी २६ टक्क्यांनी किमतीत घट करण्याची योजना आखली आहे.

ब्लॅकबेरीची शरणागती, सर्व्हर मुंबईत

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 08:51

ब्लॅकबेरी फोनच्या माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या मेसेजिंग सेवेत सरकारला कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास विरोध करणारी ब्लॅकबेरी (कंपनी-रिसर्च इन मोशन) अखेर दोन पावलं मागे आली. ब्लॅकबेरी कंपनीने मुंबईत आपला सर्व्हर लावल्याचे जाहीर केले आहे.

ब्लॅकबेरीचे प्लेबुक आता निम्म्या किंमतीत

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 23:05

ब्लॅकबेरी सिरीज फोनचे निर्माते रिसर्च इन मोशन म्हणजे रिमने प्लेबुकची किंमत निम्म्याहून कमी केली आहे. भारतात टॅबलेट पीसीला असलेली भरपूर मागणी लक्षात घेत कंपनीने 16 GBचा प्लेबुक १३,४९० रुपयांना उपलब्ध करुन दिला आहे.

रिमचे नवे हँडसेट बाजारात दाखल

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 12:13

अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत आरआयएमचे (Research In Motion) सात हँडसेट उपलब्ध आहेत. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत ही नवी मॉडेल्स अधिक वेगवान, चांगल्या प्रकारे ब्राऊझिंगचा आनंद देणारी आणि मल्टिमीडिया उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आरआयएमचे स्मार्टफोन्स देशभरात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील.

'भारतबेरी'ची 'ब्लॅकबेरी'ला टक्कर

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 07:40

'ब्लॅकबेरी'ला आता पूर्णपणे स्वदेशी 'भारतबेरी'ची टक्कर राहणार आहे.

ब्लॅकबेरी आलं वठणीवर

Last Updated: Saturday, October 29, 2011, 11:51

लिमिटेड ऍक्सेस देण्याच्या मुद्यावर अखेर ब्लॅकबेरीनं भारत सरकारसमोर नमतं घेतलं आहे. ब्लॅकबेरीनं भारत सरकारला त्यांच्या सर्व्हरचा लिमिटेड ऍक्सेस दिला. ब्लॅकबेरीची ई-मेल आणि ब्लॅकबेरी मेसेंजर या दोन जगभरातील खात्रीशीर सेवा मानल्या जातात. विशेष म्हणजे या दोन्ही सेवा एन्क्रिप्टेड आहेत.