Last Updated: Wednesday, February 20, 2013, 07:30
www.24taas.com, क्युबाव्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ कँन्सरचे ऑपरेशन आणि इलाज करून तब्बल दोन महिन्यांनंतर क्युबामध्ये परतलेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मायदेशी परतल्याची घोषणा केली आहे. थँक यू गॉड आणि माझ्या चाहत्यांनाही धन्यवाद. आता देशातच इलाज सुरू राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
काराकस इथल्या कारलोस अवारेल या सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आल्याची माहिती चावेझचे जावई आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी मंत्री जॉर्ज एरेजा यांनी माहिती दिली.
गेल्या १४ वर्षांपासून अधिक काळ सत्तेवर असणा-या 58 वर्षीय चावेझ यांना २०११ मध्ये कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं होतं. सर्जरी आणि इलाजानंतर त्यांची तब्येत ठीक असल्याचं घोषित करण्यात आलंय. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकून सत्ता काबीज केली होती.
First Published: Tuesday, February 19, 2013, 22:51