Last Updated: Thursday, May 30, 2013, 19:30
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन अगोदर ‘लॉबिंग’च्या चक्रव्युहात फसलेल्या अमेरिकन रिटेल कंपनी ‘वॉलमार्ट’ समोरच्या अडचणी वाढतच चालल्यात. वॉलमार्टनं स्थानिक न्यायालयात आपण पर्यावरण कायद्यांचा भंग केल्याची कबूली दिली. त्यासोबतच या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी ११ करोड डॉलर (६१५ करोड रुपये) भरपाई म्हणून देण्याचंही कंपनीनं मान्य केलंय.
अमेरिकन न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, वॉलमार्ट स्टोअर्सनं लॉस एन्जेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सरकारी वकिलांद्वारे आपल्यावर लावण्यात आलेले दोष स्वीकार केलेत.
कंपनीवर स्वच्छ पाणी कायद्याचा भंग करण्याचा तसंच अमेरिकेतील आपल्या दुकांनांतून पर्यावरणाच्यादृष्टीनं घातक असलेल्या वस्तू असुरक्षित पद्धतीनं फेकण्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये वॉलमार्टला सांघिक आणि प्रांतीय कायद्यांचं उल्लंघन करण्याच्या आरोपांतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी जवळजवळ ११ करोड डॉलर नुकसान भरपाई म्हणून देणार आहे. संपूर्ण अमेरिकेत कंपनीचे ४००० स्टोअर्स आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 30, 2013, 19:30